दहनविधी

उपस्थितांनी मृतदेहावर चंदनकाष्ठ, अन्य लाकूड, उदबत्ती किंवा कापूर ठेवावा. ही कृती शास्त्रात नसून ती लौकिक पद्धत आहे.

Description

आणलेल्या अग्नीच्या साहाय्याने कर्त्याने चितेला अग्नी द्यावा.

मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल, तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे. तोही नसेल, तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा, जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते. क्रियाकर्म करणाऱ्या पुरुषाला कर्ताम्हणतात

 प्रथम मृतदेहाच्या (पुरुष असल्यास) डोक्याकडे किंवा (स्त्री असल्यास) पायाकडे आणि त्यानंतर अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने) फिरत चारही अंगांनी (बाजूंनी) चिता प्रज्वलित करावी. त्यासाठी आणलेल्या अग्नीवर माडाची एखादी झावळ पेटवून घ्यावी.

मृतदेहाचा कपाळमोक्ष झाल्यानंतर (कवटी फुटल्याचा ध्वनी ऐकू आल्यानंतर) कर्त्याने खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन मृत व्यक्तीच्या पायांकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने कर्त्याच्या मागे उभे राहून स्मशानातीलच लहान दगडाने (या दगडाला अश्माअसे म्हणतात.) त्या मडक्याच्या गळ्याच्या खाली एक भोक पाडावे. कर्त्याने मडक्यातील पाणी सांडवित चितेभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पहिली प्रदक्षिणा घालावी. दुसऱ्याने परत मडक्याला पहिल्या भोकाच्या खाली दुसरे भोक पाडावे. यानंतर कर्त्याने आधीसारखीच दुसरी प्रदक्षिणा घालावी. यानंतर दुसऱ्याने परत मडक्याला दुसऱ्या भोकाच्या खाली तिसरे भोक पाडावे. कर्त्याने आधीसारखीच तिसरी प्रदक्षिणा घालावी. तिसऱ्या प्रदक्षिणेनंतर मृत व्यक्ती पुरुष असल्यास त्याच्या डोक्याकडे मृतदेहाला पाठ करून आणि मृत व्यक्ती स्त्री असल्यास तिच्या पायांकडे मृतदेहाला पाठ करून कर्त्याने उभे रहावे अन् मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडावे.

दहनविधीनंतर लगेचच नदी, तलाव किंवा विहीर येथे नामजप करत कर्त्यासह कुटुंबियांनीही स्नान करावे.

 कर्त्याने तिलांजली देण्यासाठी एका भांड्यात पाणी घालून त्यात काळे तीळ घालावेत. त्यानंतर तेथेच कर्ता, कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांनी ‘….गोत्र (मृत व्यक्तीचे गोत्र उच्चारावे.) ….प्रेत (मृत व्यक्तीचे नाव उच्चारावे.) एष ते तिलतोयाञ्जलिस्तवोपतिष्ठताम् ।

, असे म्हणत अश्म्यावर पितृतीर्थावरून ३ वेळा तिलांजली द्यावी. ज्यांचे वडील विद्यमान आहेत, अशांनी तिलांजली देऊ नये.

 कर्त्याने मडक्याला भोक पाडण्यासाठी वापरलेला अश्मा सुरक्षितपणे घरी आणावा.

महत्त्वाचे – घरी आल्यावर अत्यंत सफाईपणे स्नान करावे, स्नान करण्यामागे एक महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे

घरी आल्यावर आधी अश्मा अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

 घरात प्रवेश करण्याआधी कडुनिंबाचे पान चावावे. मग आचमन करून अग्नीचे दर्शन घेऊन, तसेच पाणी, गोमय, पांढरी मोहरी आदी मांगलिक पदार्थांना हाताने स्पर्श करून, त्यानंतर दगडावर (घराच्या दगडी पायरीवर चालेल.) पाय ठेवून हळूहळू घरात प्रवेश करावा.

घरी आल्यावर गव्हाच्या पिठाच्या (कणकेच्या) गोलावर एकच वात असणारी तेलाची पणती / निरांजन / समयी लावून ठेवावी. त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी. हा दिवा पुढे दहाव्या दिवसापर्यंत तेवत ठेवावा.

१. बांबू

२. सुंभ, म्हणजे काथ्याची दोरी (एक किलो)

३. एक लहान आणि एक मोठे मडके

४. मृतदेह झाकण्याएवढे पांढरे कापड

५. तुळशीचा हार

६. तुळशीच्या मुळातील माती

७. २५० ग्रॅम काळे तीळ

८. ५०० ग्रॅम तूप

९. दर्भ

१०. १०० ग्रॅम कापूर

११. काडीपेटी

१२. सातूच्या तांदळाच्या पिठाचे ७ गोळे

१३.पळी, पंचपात्री, तांब्या, ताम्हण

१४. आंबा-फणस यांची लाकडे

१५. कोयती

१६. भस्म / विभूती

१७. गोपीचंदन

१८. चंदनकाष्ठ

१९. गोवर्या

२०. १ वाटी पंचगव्य ( गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप यांचे मिश्रण)

२१. सोन्याचे ७ तुकडे

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

 

  • अविवाहित पुरुष अंत्यसंस्कार कसा करावा ?

अविवाहित पुरुषाच्‍या मृत्यूनंतर जसे आपण दहन विधी इतर व्यक्तींचे ज्या पध्दतीने करतो त्याच पद्धतीने करावे पण जेव्हा मृतदेह दहन करणार त्या वेळेस पिवळ्या कपड्यामधे रुईची छोटी फांदी ठेवून ती मृतदेहावर ठेवणे व नंतर अग्निसंस्कार करणे कारण काही ठिकाणी मृत व्यक्तिचा रुईबरोबर विवाह लावण्याची प्रथा पडली आहे.

  • कुमारिकेच्या आणि सुवासिनीच्या मृत्यूनंतरचि तयारी

कुमारिकेचा मृत्यू झाल्यास तिला पांढऱ्या रंगा-व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रंगाचे पातळ (लुगडे) नेसवावे.

सुवासिनीच्या मृत्यूनंतर  नवीन हिरवी साडी नेसवावी.  काचेच्या हिरव्या बांगड्या भराव्यात आणि केसांत फुलांची वेणी घालावी.  मळवट भरावा. अन्य सुवासिनींनी मृत सुवासिनीला हळदी-कुंकू लावावे.

  • लहान मुलांचा अंत्यसंस्कार कसा करावा ?

‘मृत्यूनंतर लहान मुलांचा देह पुरावा (त्याचे खनन करावे) आणि वयोवृद्धांचा (मोठ्या व्यक्तींचा) देह दहन (अग्नीसंस्कार) करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांच्या अंत्यसंस्काराविषयीची सूत्रे आणि त्यांविषयीचे शास्त्र पुढे दिले आहे.

 नामकरणापूर्वी (१२ व्या दिवसापर्यंत) बालकाचा मृत्यू झाल्यास खनन करावे. (देह पुरावा.)

चौलसंस्कार झालेल्या अथवा न झालेल्या ३ वर्षांपर्यंतच्या बालकाचे मृत्यूनंतर दहन किंवा खनन यांपैकी काहीही केलेले चालते. असे असले, तरी २ वर्षे पूर्ण न झालेल्यास मृत्यूनंतर पुरणे जास्त योग्य, तर २ वर्षे पूर्ण झालेल्यास मृत्यूनंतर दहन करणे जास्त योग्य होय. (संदर्भ : धर्मसिंधु, पृष्ठ ६०८ आणि ६०९)

‘स्थूलदेह हा पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतो. २ वर्षांपूर्वीच्या बालकाचा स्थूलदेह कोवळा असतो. त्यामुळे तो स्थूलदेह (पृथ्वीतत्त्व) मातीत (पृथ्वीतत्त्वात) सहज मिसळू शकतो, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दहनविधी”

Your email address will not be published. Required fields are marked *