दशक्रिया विधी

दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे.

Description

व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.

दुसऱ्या दिवसापासून दहा दिवसांपर्यंत जी क्रिया करावयाची ती पहिल्या दिवशी ज्या जागी क्रिया केली असेल त्याच जागी किंवा जिथे क्रिया कर्मांची जागा असेल तिथे कारवी. दहाव्यादिवशी कर्त्याने स्नान आचमन व प्राणायाम केल्यावर देशकालाचा उच्चार करुन अपसव्य करावे आणि गोत्राचा अमुक  प्रेताचे प्रेतत्व नष्ट होऊन उत्तम लोक प्राप्त होण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंतचे संकल्प सोडावा व नंतर अंगाला मृत्तिका लावुन अश्म्यावरती तिलांजली देणे नंतर परत आचमण करुन अवयव श्राद्ध व विषम श्राद्ध करावे नंतर मातीची त्रिकोणी वेदिका तयार करुन चार दिशेस चार व मधे एक असे पाच उदकुंभ मांडावे त्या कुंभामधे पाणी भरुन कुंभावर भाताचे पिंड देणे व पिंडावर पिठाचे छत्र ठेवणे कुंभाच्या बाजुला ध्वज व पिठाच्या पादुका ठेवणे व पिंड पुजन करणे नंतर सर्वांनी पिंडाला नमस्कार करणे व काकस्पर्शाचा पिंड काकस्पर्शासाठी ठेवणे कावळा शिवला कि सर्वांनी अश्म्यावरती तिलांजली देणे काही कारणास्तव कावळा आला नाही तर गुरुजी दर्भाचा कावळा केला तर तो पिंडाला शिवायला हरकत नाही नंतर सव्य करून आचमण करणे व सर्व पिंड वहात्या पाण्यात विसर्जन करावे.

हळद , कुंकू,अबिर,पांढरी गंधगोळी ,काळेतिळ,जव किंवा तांदूळ, ताम्हण ३, तांब्या १,पळी ,भांड, भाताचे पिंड १०लहान व ५ मोठे ,गव्हाच्या पिठाचे ८ पिंड व ५ छत्र १० पादुका तसेच ५ पोलीका ,५ ध्वज ,५ उदकुंभ ,     १ केळीच पान, पांढरी फुले, तुळशी, भृगराज पत्र, माती १ किलो

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दशक्रिया विधी”

Your email address will not be published. Required fields are marked *