एकोदिष्ठ श्राद्ध (11वा दिवस)

११ व्या दिवशी स्नान झाल्यानंतर वास्तूत पंचगव्य होम करून सर्वत्र पंचगव्य शिंपडावे.

Description

सर्वांनी पंचगव्य प्राशन करावे. कर्त्याने मृताच्या उद्देशाने संकल्प करून आमान्न (शिधा), तसेच दशदाने आदी द्यावीत. घराच्या बाहेर, गोठ्यात किंवा अन्यत्र वृषोत्सर्ग, एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे.

कर्त्याने पंचगव्य घेऊन दहा दिवसांचे कर्त्याचे सुतक संपते व जे पहिल्या दिवशी प्रायश्चित्त संकल्प केलेले असते त्या प्रित्यर्थ दशदान संकल्पाद्वारे करुन लौकिक अग्नी प्रज्वलित करून प्रेताच्या नावाने आहुती द्यावी व एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे. नंतर सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे अकराव्या दिवशी करावे.

कर्त्याने आचमण करुन पंचगव्य प्राशन करावे नंतर संकल्प करुन दशदान काय असते ते पुढीलप्रमाणे गाय,भूमि,तीळ,सोने,तुप, वस्त्र,धान्य,गुळ,रुपें,मीठ संकल्पाद्वारे ब्राह्मणाची पुजा करुन द्यावी नंतर आचमण करुन एकोदिष्ठ संकल्प करुन अग्नी प्रज्वलित करून अपसव्य करुन प्रेताच्या नावाने भाताची आहुती देणे एकोदिष्ठ हवन करावे नंतर अकराव्या दिवसाचे पिंडपुजन करणे नंतर सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धाचे पिंड पुजन करणे व सव्य करुन आचमण करुन पिंड वहात्या पाण्यात विसर्जन करावे.

हळद , कुंकू,अबिर,पांढरी गंधगोळी ,काळेतिळ,जव किंवा तांदूळ, ताम्हण ३, तांब्या १,पळी ,भांड, भाताचे पिंड १,गव्हाच्या पिठाचे १६पिंड व अधिक महिना असेल तर १ जास्त,केळीच पान १, पांढरी फुले,तुळशी,भृगराज पत्र , होमकुंड,समिधा गौर्या,तुप एक वाटी ,कापुर काडेपेटी व एक वाटी भात तसेच दशदान यथाशक्ती

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एकोदिष्ठ श्राद्ध (11वा दिवस)”

Your email address will not be published. Required fields are marked *