मंत्राग्नी

मानवी जन्माच्या आधीपासून (गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतरही (दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारे संस्कार हिंदू  जीवनशैलीत प्रचलित आहेत.

Description

दिवंगताविषयी आस्था,प्रेम , सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म  श्राद्ध या विधीकडे पाहिले पाहिजे  असे वाटते

अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस.या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने.आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.

भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणाया वैदिक साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणाया दहनाचे दफनविधीचे संदर्भ  आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणाया प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे

दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे.जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले आहे. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून  प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला असा आहे.

मृताला अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल, तर धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे. तोही नसेल, तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा किंवा मुलगी, जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते. क्रियाकर्म करणाऱ्या पुरुषाला कर्ताम्हणतात.

अविवाहित पुरुष / स्त्री, तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ, वडील किंवा मोठा भाऊ, नाहीतर आप्तेष्ट यांना करता येते.

कर्त्याने क्षौर करावे (डोक्यावरचे केस पूर्णपणे काढावेत.), तसेच दाढी-मिशा काढून नखेही कापावीत. क्षौर करतांना बटूप्रमाणे केसांचा घेर न ठेवता केवळ शेंडी ठेवावी.

कर्त्याचे अन्य भाऊ, तसेच मृत व्यक्तीपेक्षा लहान असलेले कुटुंबीय (ज्यांचे वडील विद्यमान नाहीत असे) यांनीही त्याच दिवशी क्षौर करावे. ते शक्य नसल्यास दहाव्या दिवशी क्षौर करावे.

कर्ता मृत व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असल्यास त्याने क्षौर करू नये.

 सूर्यास्तानंतर क्षौर वर्ज्य असल्याने सूर्यास्तानंतर क्षौर करू नये. अशा वेळी मृताची उत्तरक्रिया (प्रतिदिन करावयाचे पिंडदान अन् द्यावयाची तिलांजली) ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी कर्त्याने क्षौर करून उत्तरक्रिया आरंभ करावी. इतरांनी १० व्या दिनी क्षौर करावे.

स्मशानात पोहोचल्यावर तिरडीसह मृतदेह चितेवर ठेवतांना मृताचे पाय उत्तर दिशेला आणि डोके दक्षिण दिशेला येईल, असे करावे.

 मृतदेहाच्या पायांचे आणि हाताचे अंगठे सोडवावेत.

चिता प्रज्वलित करण्यापूर्वीचे विधी

 मृत व्यक्तीचे मुख, दोन्ही नाकपुड्या आणि कान यांत, तसेच डोळे यांवर सोन्याचे तुकडे घालावेत / ठेवावेत. सोन्याचे तुकडे घालणे शक्य नसल्यास दर्भाच्या अग्राने किंवा तुळशीच्या पानाने तुपाचे थेंब घालावेत.

कर्त्याने अग्नीचे मडके चितेच्या वायव्य दिशेला ठेवावे आणि त्यातील अग्नी प्रज्वलित करावा.

 ‘क्रव्यादनामानमग्निं प्रतिष्ठापयामि ।असे म्हणून त्या अग्नीवर काळे तीळ घालावेत. (काही जण मृतदेहाच्या वायव्य दिशेला भूमीवर मातीची त्रिकोणी वेदी बनवतात अन् त्यात गोवर्यांवर मडक्यातील अग्नी ठेवून तो प्रज्वलित करतात.) त्यावर पळीने पुढीलप्रमाणे तुपाच्या आहुत्या द्याव्यात. प्रत्येक वेळी पुढील एकेक मंत्रातील स्वाहाम्हणतांना आहुती द्यावी आणि नंतर ‘…. इदं न मम ।असे म्हणावे.

अग्नये स्वाहा । अग्नय इदं न मम ।।

कामाय स्वाहा । कामाय इदं न मम ।।

लोकाय स्वाहा । लोकाय इदं न मम ।।

अनुमतये स्वाहा । अनुमतय इदं न मम ।।

यानंतर ॐ अस्माद्वैत्वमजायथा अयं त्वदभिजायताम् । असौ….(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय स्वर्गाय लोकाय स्वाहा ।।असे म्हणून तुपाची आहुती मृतदेहाच्या छातीवर द्यावी आणि ‘…. (मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय इदं न मम ।असे म्हणावे.

मृत व्यक्तीचे कपाळ, मुख, दोन्ही बाहू आणि छाती या पाच ठिकाणी सातूच्या / तांदळाच्या पिठाचे सुपारीएवढ्या आकाराचे गोळे ठेवावेत. प्रत्येक गोळ्यावर तूप घालावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मंत्राग्नी”

Your email address will not be published. Required fields are marked *