मासिक श्राद्ध

मासिक श्राद्ध हे बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे.

Description

मासिक श्राद्ध हे बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे आता हे शक्य नसल्यामुळे शक्यतो बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी करण्याचा प्रघात पडला आहे

तसेच बारा महिन्यांत सोळा श्राद्ध सांगितले आहे पण अधिक महिना असेल तर एकुण मासिक श्राद्ध सतरा कारवी लागतात.

मासिक श्राद्ध हे तेराव्या दिवशी घरी निधन शांत झाल्यावर दोन देवांचे व सोळा पितरांचे असे ब्राह्मण किंवा चटस्वरुपी ब्राह्मण पुजन करुन गोड जेवण देऊन मासिक पिंड पुजन करणे व घरच्या मंडळींनी पिंडाला नमस्कार करुन गोड भोजनाचा प्रसाद घ्यावा वास्तविक पाहतां अपकर्ष करुन मासिक श्राद्धे सपिंडी पूर्वी केली असल्यामुळे पुन्हा करावयाची आवश्यकता रहात नाही तथापि ती पुनः करण्याचा प्रघात पडला आहे इतकेच नव्हे तर ती पुन्हा वेगळ्या वेळी न करितां तंत्राने एकदमच तेराव्या, सोळाव्या दिवशी मासिक श्राद्ध करतात.

हळद , कुंकू,अबिर,पांढरी गंधगोळी ,काळेतिळ,जव किंवा तांदूळ, ताम्हण ३, तांब्या १,पळी ,भांड, भाताचे पिंड ३, केळीच पान १०, विड्याची पाने ५०,नारळ१ ,पांढरी फुले,तुळशी,भृगराज पत्र , श्राद्धाचा स्वयंपाक पुढीलप्रमाणे वडा,खिर ,कडी,आळुची भाजी ,कारले ,गवार भोपळा, वरण,भात,पोळी,रवा बेसन मिक्स लाडु ,आमसुलं चटणी , कोशिंबीर,नारळाची चटणी,दहि ,लिंबु असे सर्व पदार्थ अकरा पर्यंत तयार ठेवणे.

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मासिक श्राद्ध”

Your email address will not be published. Required fields are marked *