निधन शांत

व्यक्तीच्या मृत्यूमुळे निर्माण झालेले अरिष्ट दूर करण्यासाठी ही निधन शांती करतात.

Description

 ही शांती शुद्धीसाठी आहे. या शांतीमधे वरुण आणि मृत्युंजय देवता यांच्या पूजनाबरोबरच निरनिराळ्या वैदिक सूक्तांचे पठण केले जाते.

हे कार्य बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी घरी किंवा मंदिरात केले जाते.

सर्व प्रथम आचमन करून कर्त्याने  गुरुजींकडुन पंचगव्य प्राशन करावे व यज्ञोपवीत धारण करावे . नंतर संकल्प करुन गणेश पुजन ,वरुन पुजा व मृत्युंजय पुजन करावे व वैदिक सुक्तांचे पठण करावे नंतर घराच्या उंबरठ्यावर सुपारी फोडणे नंतर वरुन पुजेचे जे तिर्थ आपल्या कुळातील मंडळींवर अभिमंत्रित पाण्याने अभिषेक करणे नंतर सर्व मंडळींनी कपाळी गंध व सवाशनींनी हळद कुंकू लावून घेणे व आपल्या कुलदेवताचा विडा सुपारी पैसा तसेच एक नवीन निरांजन अगरबत्ती देवापाशी काढुन ठेवणे व त्या दिवशी घरातील आपल्या देवांची पुजा करणे.

फुल ,तुळस,बेल, दूर्वा,फळ ५, विड्याची पाने २५, अंब्याचेडहाळे,हळद, कुंकू,अबिर,चंदन, रांगोळी, पंचामृत, गोमुत्र, जान्हवी जोड ५,सुपारी २५, तांदुळ २किलो,नारळ५, ब्लाऊजपिस१, पंचा१,तुप, निरांजन, अगरबत्ती, कापूस,कापूर, काडेपेटी,ताट२, वाटी १०, पातील१, तांब्याचे तांबे२, ताम्हण२, पळी भांड, पाट किंवा आसने ४, सुट्टी नानी २५ रुपये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निधन शांत”

Your email address will not be published. Required fields are marked *