पलाशविधी

मृत व्यक्तीचा देह मिळत नसल्यास अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी धर्मशास्त्राने ‘पालाशविधी’ करण्यास सांगितला आहे.

Description

एखादी व्यक्ती हरवली असेल आणि काही कालावधीनंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे’, असे समजले, तर अशा प्रसंगात व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही. अशा वेळी धर्मशास्त्राने पालाशविधीकरण्यास सांगितला आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा देह किंवा अस्थी त्यांच्या नातेवाईकांकडे दिल्या जात नाहीत किंवा एखाद्या व्यक्‍तीचे देहदान केले असेल त्या वेळेस या प्रसंगीही धर्मशास्त्रानुसार पालाशविधीकरणे सयुक्तिक होईल. हा पलाश विधी त्या मृत व्यक्तीसाठी महत्वाचा आहे.

1) व्यक्ती मृत झाल्यावर ती व्यक्ती प्रेतयोनीत जाते. त्यासाठी पळसाची पाने, दर्भ, पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार ठराविक प्रकारची फळे आणि पाने ठराविक संख्येत घेऊन त्या व्यक्तीचा पुतळा सिद्ध करावा.

2) त्या पुतळ्याला सातूच्या पिठाचे लिंपन करावे. त्यानंतर प्रत्यक्ष मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतांना ज्याप्रमाणे मृतदेहाला मंत्राग्नी दिला जातो, त्याप्रमाणे त्या पुतळ्याला मंत्राग्नी द्यावा.

3) त्या पुढील दिवसांचे विधीही नेहमीप्रमाणेच क्रमाक्रमाने करावेत.

4) त्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी त्रिपाद शांतकिंवा पंचक (अशुभ नक्षत्रे)लागले असेल, तर त्यासाठीचे विधीही नेहमीप्रमाणेच करावेत.

5) एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी दशक्रियाविधी आदी अंत्यविधी केले जातात, अशा ठिकाणी हा विधी करावा.

6) हे विधी करतांना घरातील आवश्यक आणि मोजक्याच व्यक्तींनी उपस्थित रहावे. 

त्यासाठी पळसाची पाने, दर्भ, सातूचे पिठ पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार ठराविक प्रकारची फळे आणि पाने ठराविक संख्येत घेणे

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पलाशविधी”

Your email address will not be published. Required fields are marked *