पंचक शांत

पंचक म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचे उत्तरार्धास आरंभ करुन रेवतीच्या अंतापर्यत असणारीं साडेचार नक्षत्रें,

Description

 या पंचकांत दहनाचा निषेध आहे. म्हणून दर्भमय पुतळे करुन ते यवांचे पिठानें लिप्त करावे व पांच ऊर्णासूत्रानें त्यांस वेष्टन करुन त्यासह शवाचें दहन करावें. त्यांविषयी तिथि इत्यादिकांचा उच्चार करुन

अमुकस्य धनिष्ठापंचकादिमरणसूचित वंशारिष्टविनाशार्थ पंचकविधि करिष्ये

असा संकल्प करावा व उक्त प्रकारच्या प्रतिमा नक्षत्र मंत्रांनी अभिमंत्रण करुन गंधपुष्पांनी पूजा करुन दहनकालीं त्या प्रेतावर ठेवाव्या. पहिली मस्तकावर, दुसरी नेत्रांवर, तिसरी वामकुक्षीवर, चवथी नाभीवर व पांचवी पायांवर, याप्रमाणें ठेवून त्या प्रतिमांवर नाममंत्रांनी घृताहुती हवन कराव्या. त्याविषयी

प्रेतावहः, प्रेतसखः, प्रेतपः, प्रेतभूमिपः, प्रेतहर्ता,

अशीं नांवें क्रमानें जाणावीं. नंतर उदक देऊन

यमायसोम० त्र्यंबकं०

या दोन मंत्रांनी प्रत्येक प्रतिमेवर घृताहुतींनी हवन करावें. नंतर प्रेताचे मुखांत पंचरत्ने घालून पुतळ्यासह प्रेतांचें दहन करावें. सूतकाच्या अंती तिल, सुवर्ण, घृत यांची दानें करुन कांस्यपात्रांत तेल घालून त्यांत आपलें प्रतिबिंब पाहून तें ब्राह्मणास द्यावें व शांतीही करावी.

अन्य नक्षत्रीं मरण पावलेल्याचा दाह पंचकांत प्राप्त झाल्यास पुतळे करावे, शांति करुं नये. पंचकांत मरण पावलेल्याचा दाह अश्विनी नक्षत्रांत प्राप्त झाल्यास शांतीच करावी, पुतळे करुं नयेत. शांति करावयाची ती लक्षहोम किंवा रुद्रजप यांतून कोणतीही शक्त्यनुसार करावी. अथवा कलशावर यमाच्या प्रतिमेची पूजा करुन आपल्या गृह्य सूत्रांत सांगितलेल्या विधीनें अग्निस्थापन, अन्वाधान, चरु शिजविणें येथपर्यत कर्म करुना आज्य भागांत कर्म केल्यावर ” १ यमायस्वाहा, २ धर्मराजाय०, ३ मृत्यवे०, ४ अंतकाय०, ५ वैवस्वताय०, ६ कालाय०, ७ सर्वभूतक्षयाय०, ८ औदुंबराय०, ९ दध्नाय०, १० नीलाय०, ११ परमेष्ठिने०, १२ वृकोदराय०, १३ चित्राय०, १४ चित्रगुप्ताय०, ” या नाममंत्नांनी चरुच्या चवदा आहुतींनी होम करावा. याप्रमाणें होम करुन होमशेष समाप्त केल्यावर 

 कृष्णांगां कृष्णवस्त्रांच हेमनिष्कसमन्वितां । दद्याद्विप्राय शांताय यमो मे प्रीयतामिति ॥ 

 या मंत्रानें गोदान करावे.

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

पंचक शांत हि अकराव्या दिवशी करावी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचक शांत”

Your email address will not be published. Required fields are marked *