सपिंडी श्राद्ध (१२वा दिवस)

सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला पितृही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते.

Description

 खरे पहाता १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; सपिंडी केल्याशिवाय चल, उपनयन, विवाह इत्यादी मंगलकार्ये करता येत नसल्याने,सपिंडी श्राद्ध बाराव्या दिवशी करण्याच्या आता प्रघात पडला आहे.

सपिंडी श्राद्ध जिथे आपण ज्या ठिकाणी क्रियाकर्म करत आहे त्या ठिकाणी क्रियाकर्म करावे सर्व प्रथम आचमन करून संकल्प करावा व यवोदक,तिलोदक,प्रेतोदक करून चटस्वरुपी काम काल ,प्रेत व पितृ यांचे पुजन करावे नंतर सर्व चटीस्वरुपी ब्राह्मणांना भोजन द्यावे नंतर प्रेताच्या नावाने व पितरांच्या नावाने भाताचा पिंड देणे पिंडपुजन झाल्यावर सोन्याच्या दोरीने किंवा दर्भाची दोरी करुन पिंड छेदन करणे व प्रेताचा पिंड मागील जे तिनं पिढ्या़च्या नावाने जे पिंड दिले आहे त्या पिंडामधे मिळवणे म्हणजे प्रेतातुन पितृ लोकांत विलीन करणे नंतर पिंड पुजन करुन नेवैद्य दाखवणे व गेलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून आपल्या आवडीचा पदार्थ एक वर्ष सोडावा नंतर कावळ्याला नैवैद्य खायला देणे नंतर आचमण करुन पिंड वहात्या पाण्यात विसर्जन करावे.

हळद , कुंकू,अबिर,पांढरी गंधगोळी ,काळेतिळ,जव किंवा तांदूळ, ताम्हण ४, तांब्या १,पळी ,भांड, भाताचे पिंड ३ व लांबडा पिंड १,,केळीच पान ५, विड्याची पाने २५, पांढरी फुले,तुळशी,भृगराज पत्र , नैवैद्यासाठी वरण,भात, तांदूळ खिर,गवाराची व कारल्याची भाजी,भोपळ्याचे भरीत,भाजनीचा वडा ,आमसुलं चटणी दहि ,लिंबु असे सर्व पदार्थ

पुरोहितांच्‍या सन्‍मतीने सामुग्रीची व्यवस्था करावी.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सपिंडी श्राद्ध (१२वा दिवस)”

Your email address will not be published. Required fields are marked *